चिंचवड(प्रतिनिधी) मालदीव येथे नुकत्याच येथे पार पडलेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्स स्केटिंग क्लब च्या श्रीअंश विश्वकर्मा, रुचिका वैभव बिळगी, विधान धनंजय हेडाऊ व कृतिका दत्तात्रय मोरे या चार स्केटर्स नी ११ सुवर्णपदक व ३ सिल्वर पदक मिळवत देशाचे नाव उंचावले आहे.
या सर्व स्केटर्सनी गोवा येथे स्पोर्ट्स एल.यु.पी. आयोजित गोवा स्केटिंग फेस्टिवल आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झाले होते. तेथे चमकदार कामगिरी करून या चार स्केटर्स नी स्वतःचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नोंदविले. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा मालदीव देशातील हूलहूमाले व माले शहरामध्ये संपन्न झाली. ही स्पर्धा रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव तर्फे आयोजित करण्यात आली होती. तसेच स्पोर्ट्स ऑथोरिटी गव्हर्मेंट ऑफ मालदीव व इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मालदीव यांची या स्पर्धेस मान्यता प्राप्त होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सूत्रसंचालन मालदीव स्केटिंग असोसिएशन चे अध्यक्ष सुलपीकर अली, मोहम्मद हनिम व स्पोर्ट्स एल.यु.पी. समन्वयक राहुल बिळगी यांनी केले. या स्पर्धेत 170 स्केटर्स सहभागी झाले होते. भारतातून 11 स्केटर्सनी टीम स्पोर्ट्स एल.यु.पी इंडिया तर्फे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्व भारतीय स्पर्धकांना स्पोर्ट्स एल.यु.पी. कोऑर्डिनेटर राहुल बिळगी यांच्या कडून तीस हजार रुपयांची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप देण्यात आलेली.
स्पर्धेचा निकाल
1) श्रीअंश विश्वकर्मा – जी. के. गुरुकुल स्कूल पिंपळे सौदागर – वयोगट तीन ते पाच वर्षे – 3 गोल्ड, 1 सिल्वर मेडल्स , ओव्हरऑल बेस्ट स्केटर चषक कप व चंपियनशिप ट्रॉफी मिळविली.
2) विधान धनंजय हेडाऊ – केंद्रीय विद्यालय स्कूल बाणेर – वयोगट सात ते नऊ वर्षे – 3 गोल्ड, 1 सिल्वर मेडल्स, ओव्हरऑल बेस्ट स्केटर चषक कप व चंपियनशिप ट्रॉफी मिळविली.
3) रुचिका वैभव बिळगी – राहुल इंटरनॅशनल स्कूल हिंजेवडी – वयोगट 11 ते 13 वर्षे – 5 गोल्ड मेडल्स ओव्हरऑल बेस्ट स्केटर चषक कप व चंपियनशिप ट्रॉफी मिळविली.
4) कृतिका दत्तात्रय मोरे – एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर – वयोगट 11 ते 13 वर्षे – 1 सिल्वर मेडल् व चंपियनशिप ट्रॉफी मिळविली.
सर्व स्पर्धकांना क्लबचे हेड कोच वैभव बिळगी, राहुल बिळगी तसेच वंदना बिळगी , सुरज दीक्षित, चिंतामण राऊत, रिषभ गावंडे, पूजा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल येताच नाना काटे सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष नाना काटे यांनी व्हिडिओ कॉल करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
श्रीअंश विश्वकर्मा वय साडेचार वर्ष हा रोलर स्केटिंग मधील देशातील सर्वात छोटा खेळाडू ठरला आहे ज्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड होऊन त्याने देशासाठी मेडल्स मिळवले आहे.