मुंबई:गेल्या 2 महिन्यापासून चाललेल्या IPL च्या 2023 या वर्षाचा विजेता मिळाला आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये गुजरात टायटन व चेन्नई सुपर किंग यांच्यात रंगलेल्या फायनल च्या सामन्यात चेन्नई ने बाजी मारत शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकत पाचव्यांदा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला आहे.
पावसामुळे व्यत्यय आल्याने रविवारचा सामना हा काल म्हणजेच सोमवारी खेळवण्यात आला होता.परंतु काल देखील पावसाने व्यत्यय आणल्याने सामना होईल का यात शंका होती.परंतु रात्री उशिरा सुरू झालेला सामना अखेर चेन्नई ने जिंकला.
चेन्नई ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असेच वाटत होते कारण गुजरात च्या शुभमन गील आणि वृद्धिमान साह यांनी आक्रमक सुरुवात करून दिली त्यानंतर सुदर्शन ने आकर्षक फटकेबाजी करत गुजरात ला 214 पर्यंत मजल मारून दिली.फायनल मध्ये एवढा स्कोर झाल्याने गुजरात जिंकेल असे वाटत असताना पावसाला सुरुवात झाली आणि मॅच पुन्हा थांबवावी लागली.रात्री उशिरा पुन्हा मॅच ला सुरुवात झाली.चेन्नई ला 15 ओव्हर मध्ये 171 धावांचे सुधारित लक्ष देण्यात आले.या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई च्या कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक फलंदाजी करत चेन्नई ला चांगली सुरुवात करून दिली.शेवटी 2 बॉल वर 10 धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने एक षटकार व एक चौकार मारून विजय खेचून आणला.या सामन्यासहीत चेन्नई ने पाचव्यांदा आयपीएल ची ट्रॉफी जिंकली आहे.यासोबत मुंबई च्या पाच ट्रॉफी जिंकण्याची बरोबरी देखील केली आहे