Arvind Kejriwal Defeated in Delhi: राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसलाय.
New Delhi Assembly Constituency: दहा वर्षानंतर दिल्लीत आपच्या सत्तेला सुरुंग लागलाय. आप पक्षाचे
प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा जोरदार धक्का बसलाय. नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झालाय. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा दारूण पराभव केलाय, मनिष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसलाय. मुख्यमंत्री अतिशी पिछाडीवर आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला जोरदार झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झालाय, भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दणदणीत विजय मिळवला. संदीप दीक्षित यांच्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव केल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. संदीप दीक्षित यांनी ३ हजारांपेक्षा जास्त मते या मतदारसंघात घेतली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याची धुरा आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण आजी आणि माजी मुख्यमंत्री पराभवाच्या छायेत आहेत. आतिशी यांचाही पराभव होईल, असे चित्र दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. पण दिल्लीमध्ये आपचा आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय. २७ वर्षानंतर भाजप पुन्हा दिल्लीमध्ये सत्तेत बसणार आहे.