SBI Investment Scheme: यामध्ये ग्राहक दर महिन्याला आपली छोटी बचत गुंतवू शकतात आणि लाखो रुपये जमा करू शकतात. त्याचबरोबर योजनेत मिळणारे व्याजदरही अतिशय आकर्षक आहेत.

 

SBI Bank Alert! State Bank of India asks to follow these 6 tips while  banking online – India TV

SBI Investment Scheme: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत लोक दर महिन्याला थोडीफार गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकतात. आम्ही एसबीआयच्या हर घर लखपती योजनेबद्दल (Har Ghar Lakhpati) बोलत आहोत. एसबीआयची ही योजना रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी स्किम आहे. यामध्ये ग्राहक दर महिन्याला आपली छोटी बचत गुंतवू शकतात आणि लाखो रुपये जमा करू शकतात. त्याचबरोबर योजनेत मिळणारे व्याजदरही अतिशय आकर्षक आहेत.

SBI Har Ghar Lakhpati स्कीम:

एसबीआयच्या हर घर लखपती योजनेत तुम्ही ३ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीचा काही भाग दर महिन्याला नियमितपणे गुंतवावा लागेल, त्यानंतर तुमची रक्कम व्याजासह तुम्हाला परत केली जाईल. १० वर्षापर्यंतची मुलंही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हर घर लखपती योजनेचे व्याजदर:

हर घर लखपती योजनेच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झालं तर मॅच्युरिटी पीरियडनुसार या योजनेत वेगवेगळे व्याजदर आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी या योजनेतील व्याजदर ६.७५ टक्के आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.२५ टक्के आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्यानं या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याला ५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

………तर व्हाल लखपती

दररोज ८० रुपयांपर्यंत बचत केल्यास संपूर्ण महिन्यात २५०० रुपयांची बचत होऊ शकते. हर घर लखपती योजनेत दर महिन्याला हे २५०० रुपये नियमितपणे गुंतवा. ३ वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडनुसार तुम्ही अशा प्रकारे १ लाख रुपयांचा फंड जमा करू शकता.

Maya Dinesh Kashid

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!