मुंबई प्रतिनिधी: “लोक माझे सांगाती”या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडणार असल्याचे जाहीर करताच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ करायला सुरुवात केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात कलाटणी देणारा निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला. “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे.तसेच राज्यसभा खासदारकी ची मुदत पण आता संपणार आहे आणि यानंतर आपण कुठलीच निवडणुकीस लढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांचा हा निर्णय सभागृहात उपस्थित कोणालाच मान्य नसल्याने सर्वांनी एकच गोंधळ करत घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनंती केली.तसेच जोपर्यंत आपण निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.यावेळी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी देखील शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली.
आता शरद पवार काय भूमिका घेतात व जर शरद पवारांनी अध्यक्षपद सोडले तर अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे आहे.