चिंचवड: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल संपला असल्याने आता छुप्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे.यातच काल तिघा जणांना पैशे वाटप करताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.

उद्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान पार पडणार आहे पण तत्पूर्वी चिंचवड विधानसभेत पैसे वाटप करताना तिघा जणांना भरारी पथकाने रांगे हाथ पकडले आहे. त्या पकडलेल्या व्यक्तींकडे दोन हजार रुपयांचे बंडल सापडले मिळाले असून एकूण रोख रक्कम १,७०,०००/- रुपये तसेच भाजपाच्या स्लिप आणि मतदारांची नावे लिहिलेले कागद सापडले आहेत.शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवराज कॉलनी काळेवाडी रहाटणी येथे हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
मतदारांना प्रलोभन दाखवून पैशांचे वाटप करताना तीन जणांविरुद्ध काळेवाडी पोलीस अंकित वाकड पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला आहे. काळेवाडी पोलीस अंकित वाकड पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहे.