चिंचवड: देशभर गाजलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथ विधी बाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

२०१९ साली भल्या पहाटे जे महाराष्ट्र सरकार स्थापन झाले होते त्याबाबतीत बरेच तर्क वितर्क लावले जात होते.राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,आणि काँग्रेस पक्ष या पक्षांची युती घडवून आणण्याचे काम शरद पवारांनी केले होते.परंतु मध्येच अजित पवार यांनी भाजपा चे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भल्या पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.ते सरकार अत्यंत अल्प काळ टिकले होते.त्या काळात अजित पवार हे बराच वेळ गायब झाले होते.यानंतर राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर अजित पवार स्वगृही दाखल झाले.यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

परंतु आजवर त्या पहाटेच्या शपथविधी बद्दलचे गूढ उलगडले न्हवते.परंतु राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केलेला प्लॅन होता.तसे केले नसते तर केंद्राने राष्ट्रपती राजवट उठवली नसते.राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी तो शपथ विधी घडवून आणला होता असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

Maya Dinesh Kashid

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!